◼️ काव्यरंग : होते ते दिवस लहानपणीचे

होते ते दिवस लहानपणीचे

होते ते दिवस लहानपणीचे
गोट्या, विटी – दांडू, लपंडावाचे

पाटी पुस्तक धरुन शाळेत जाऊ
दुपारच्या सुट्टीत मिळत असे खाऊ

शाळेत मात्र मन लागत नसे
भोवताली चित्र खेळाचे दिसे

वाटे कधी होणार सुट्टी
कधी – कधी शाळेला मारत असे बुट्टी

सकाळची शाळा असे शनिवारी
शाळेत जाण्याची नसे तैयारी

शाळेत कधी रस लागत नव्हता
सुट्टी कधी होते वाट बघायचा

सोम ते शनी उदास मन
रविवारचा असे दिवस छान

सुट्टीच्या दिवशी मौज – मस्ती
मस्ती – मस्तीत होत होती कुस्ती

खेळा – खेळात दिवस कसा जायचा
संध्या झाली तरी खेळत बसायचा

आजही वाटते तो दिवस यावा
ज्यात सोमवार – शनी नसावा…!

◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *