पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा दौरा

पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा दौरा

 चंद्रपूर, दि. 31 जानेवारी : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभागखार जमिनी विकास,आपत्ती व्यवस्थापनमदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांचा दिनाक 1 फेब्रुवारी रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दिनांक 1 फेब्रुवारी 2021 रोजी सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे गडचिरोलीहून आगमन व जिल्हाधिकारी यांचेसमवेत विकास कामासंदर्भात चर्चा. स. 11.30 वा. ग्रामीण मार्ग व जिल्हा मार्ग योजनेअंतर्गत निवड व सनियंत्रण समितीची जिल्हाधिकारी कार्यालयातील वीसकलमी सभागृहात बैठक.  दु. 1 वा.  मग्रारोहयो संदर्भात विसकलमी सभागृहात संबंधीत अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक.  दु. 2.30 वा. आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने सुरू असलेल्या धान्य खरेदी बाबत संबंधीत अधिकाऱ्यांसमवेत विस कलमी सभागृह येथे आढावा बैठक. सायं. 5 वा. नागपूरकडे प्रयाण.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *