◼️ काव्य रंग : फुकणी

फुकणी

ओलं चिंब सरपणं
बाई गं पेटता पटनां
घाली चुलीत लाकडं
बाई ढोसता ढोसनां

जेंव्हा आईचे डोळे
लागे घळघळा धारा
धुराने लालबुंध झाले
तेव्हा फुकणी सहारा

फुकणीने चुलीत घाली
फुंकरने पोटातली हवा
ढणाढणाच शिलगली
चुल बाई पेटली तवा

स्वंयपांक होतोच छान
बांबूची की लोखंडाची
बायका म्हणतात खरी
फुकणी ही लई कामाची

९४२३०४६६०६

◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️🔷◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *