जिल्ह्यात गत 24 तासात पाच पॉझिटिव्ह Ø  आतापर्यंत 22,567 जणांची कोरोनावर मात Ø ॲक्टीव पॉझिटिव्ह 126

जिल्ह्यात गत 24 तासात पाच पॉझिटिव्ह

Ø  आतापर्यंत 22,567 जणांची कोरोनावर मात

Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 126

चंद्रपूर, दि. 2 फेब्रुवारी :  जिल्ह्यात मागील 24 तासात पाच कोरोनाबाधीत रुग्ण नव्याने आढळून आले आहेत, त्यामुळे आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार 85 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 22 हजार 567 झाली आहे. सध्या 126 बाधितांवर उपचार सुरू आहे. आतापर्यंत दोन लाख एक हजार 255 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 76 हजार 254 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

            जिल्ह्यात आतापर्यंत 392 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 354, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली 19, यवतमाळ 15, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या पाच रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालीका क्षेत्रातील दोन, ब्रम्हपुरी दोन व नागभिड येथील एका रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना आजार अद्याप गेलेला नाही, कोरोनाचे रूग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातुन अद्यापही आढळून येत आहेत. तरी नागरिकांनी स्वत:च्या आरोग्याबाबत जागरूक राहावे, बाहेर निघतांना नियमितपणे मास्कचा वापर करावा, वेळोवेळी हात स्वच्छ करावे तसेच प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *