उठ माणसा जागा हो
उठ माणसा जागा हो ।
समाजाचा धागा हो ।।
कर संकटाचा सामना ।
पुर्ण कर आपुली कामना ।।
परिस्थितीशी लढायला शिक ।
ना मागावी लागणार भीक ।।
सोडू नको नाती – गोती ।
ज्या मिळाल्या जन्मती ।।
झाला अन्याय तुजवर भुती ।
सुख येईल समोर भविष्यती ।।
जगायला शिक एकजुटीने ।
दुःख वाहून जातील बांधिलकीने ।।
आता कर तू स्वार्थाचा त्याग ।
जाग माणसा जाग ।।
मो. 9373675398