◼️ काव्यरंग : ठिणगी ◼️✍️सदस्या मराठीचे शिलेदार समूह

मराठीचे शिलेदार कविता, चारोळी समूहातील सर्व समूहात दि ०३/०२/२०२१ रोजी घेण्यात आलेल्या ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेतील ‘ठिणगी’ या विषयावरील सर्वोत्कृष्ट ३ काव्यरचना.

ठिणगी

पडता ठिणगी
वणवा पेटला
प्रेमाचा बुरखा
क्षणात फाटला

जपून वापरा
शब्द हे मोलाचे
अनर्थ आणती
कलह नात्याचे

गैरसमजाने
जीवनाचा नाश
संवाद साधतो
जीवनी विकास

विकोपाला नेई
आग कलहाची
लज्जत वाढवी
गोडी संवादाची

जुळावेत मनी
बंध रेशमाचे
नको ती ठिणगी
कारण विरहाचे

मिलन डोरले/मोहिरे पुणे
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह
💥🌈💥🌈💥🌈💥🌈💥🌈💥🌈
ठिणगी

लहानशी ठिणगी मात्र
तांडव करते मोठा
नियती घेऊन येते
मग दु:खाच्या लाटा।

कुणाच जाळते घर
तर कुणाच जाळते मन
ह्यदयातही पाडते घाव
निराशेतून जाळते तन।

संशयाचा भडका पेट घेते
न व्हायला पाहिजे तेही होते
ऐकेना मग कोणी कोणाच
जो तो माझंच खरं म्हणते।

वादाची ठिणगी वाढतच जाते
भल्या भल्याचा नाश करते
जीवावर उठून एकमेकांच्या
सुखी संसाराच वाटोळ करते।

सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर
मराठीचे शिलेदार समूह
💥🌈💥🌈💥🌈💥🌈💥🌈💥🌈
ठिणगी

माचीसची एकच ठिणगी
सारे जाळून करी खाक
नासधूस होऊन सारे
शेवटी उरे केवळ राख

इंग्रजाच्या अत्याचाराने जेव्हा
पेटून उठले होते वीर सेनानी
ठिणगी पेटवून मनांमनात
घडविली स्वातंत्र्याची नवी कहाणी

मत्सराची ठिणगी जळता मनात
होतो मोठा आघात
शब्दांनी घालून घणाचे घाव
क्षणार्धात मोडला जातो नात्यांचा डाव

ज्वंलत आदर्श डोळ्यासमोर ठेऊन
जेव्हा ठिणगी पेटते उरात
कास धरुन ध्येयाच्या दिशेने
राज्य करता येते जनामनांत

सौ.राणी राजेश पाटील
वडवली कल्याण ठाणे
©सदस्या मराठीचे शिलेदार समूह
💥🌈💥🌈💥🌈💥🌈💥🌈💥🌈

मुख्य प्रशासक/संपादक
राहुल पाटील
७३८५३६३०८८
➖➖➖➖🍁🌿🍁➖➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *