◼️काव्यरंग : फितुरकी

🔴 फितुरकी

आजकाल नात्यानात्यातील
संपत चालली आपुलकी
आपलेच लोक स्वार्थापायी
करतात सतत फितुरकी

संपत्तीच्या हव्यासापायी
जन्मदात्यांशी करती कावा
परक्यांना फितुर होवून
भाऊबंदकीतच खेळती डाव

संभाजीराजेशी केला घात
विश्वासपात्र लोकांनीच
औरंगजेबाने केला क्रुर वध
फितुर लोकांच्या सहकार्यानीच

देशाप्रती करून फितुरकी
देती परकियांना साथ
अशा आत्मघातकी फितुरांना
द्यावा कठिण शिक्षेचा फास

जागवून आपली नितीमत्ता
ठेवावे संस्काराचे भान
फितुरकी करून न मिळे
अंती जीवनात समाधान

◼️🔴◼️🔴◼️🔴◼️🔴◼️🔴◼️🔴◼️🔴◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *