पेट्रोल, डीझेलच्या दरवाढी विरोधात शिवसेनेच बैलगाडी मोर्चा

पेट्रोल, डीझेलच्या दरवाढी विरोधात शिवसेनेच बैलगाडी मोर्चा

चंद्रपूर :- कोरोना लॉकडाऊननंतर जवळजवळ 20 वेळा झालेल्या पेट्रोल डिझेलच्या दरवाढीला विरोध करत आज शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रात ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत.
चंद्रपूर शहरात शिवसेना जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार च्या इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले.
बैलबंडी व दुचाकी रॅली या आंदोलनाचं आकर्षण होतं, इंधन दरवाढ, घरगुती गॅस सिलेंडर यासह अनेक गोष्टींचा विरोध करत हे आंदोलन करण्यात आलं.
जटपुरा गेट वरून आंदोलनाला सुरुवात करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहचले.
पेट्रोल आणि डिझेल महागल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रवास करणं आणि त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचे दरवाढ होत असल्यामुळे नागरिकांना महागाईचा भडका सहन करावा लागतोय. आंदोलनादरम्यान केंद्र सरकार, मुर्दाबाद, मोदी सरकार राजीनामा दो अशी नारेबाजी करण्यात आली.
जिल्हाप्रमुख संदीप गिर्हे यांनी यावेळी केंद्र सरकारने देशवासीयांची फसवणूक केली, मोदी सरकार सत्तेत आल्यावर पेट्रोल, डीझल व गॅस सिलेंडरचे भाव कमी करू असे आश्वासन दिले होते मात्र ते आश्वासन पूर्णतः खोटे निघाले, मोदींनी आता राजीनामा दिला पाहिजे.
सदर आंदोलनात शिवसेना, युवासेना व महिला सेनेचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *