◼️ काव्यरंग : शेगावीचा राणा

शेगावीचा राणा

गण गण गणात बोते
शेगावीच्या राणा ची महती
अद्भुभूत घटना घडविती
सर्व भक्तांना येती प्रचिती

नैवेद्याला आवडे झुणका-भाकर
भक्तिरसात भाविक तरतात
ज्ञानाचा उपदेश दिला सर्वांना
कर्मभक्ती सर्व मनात भरतात

महाराजांच्या भंडाऱ्यात बघा
भक्तांना भोजनदान मिळते
कुणीही उपाशी राहत नाही
आजही मठात चूल जळते

भक्तिभावाने दर्शन घ्यावे
शेगाव दर्शनाची करावी वारी
मनोकामना पूर्ण होतात
संकटातून महाराज तारी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *