संघटन बाधणीसाठी बुथ सक्रीय करण्‍यावर भर द्यावा – आ. सुधीर मुनगंटीवार; आर्वी तालुका भाजपाच्‍या बुथ संपर्क अभियानाचा शुभारंभ

संघटन बाधणीसाठी बुथ सक्रीय करण्‍यावर भर द्यावा – आ. सुधीर मुनगंटीवार

आर्वी तालुका भाजपाच्‍या बुथ संपर्क अभियानाचा शुभारंभ

चंद्रपूर : भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्‍हणून आपले ध्‍येय केवळ सत्‍ताप्राप्‍ती नाही तर तळागाळातील सामान्‍य व्‍यक्‍तीपर्यंत पोहणे हे आपले ध्‍येय असले पाहीजे. परिश्रम केले की यश हमखास मिळते. त्‍यामुळे बुथ सक्रीय करण्‍यावर भर देण्‍याचे आवाहन माजी अर्थमंत्री तथा विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दिनांक 6 फेब्रुवारी रोजी वर्धा जिल्‍हयातील आर्वी येथे बुथ संपर्क अभियानाच्‍या उदघाटनप्रसंगी आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी मंचावर आ. दादाराव केचे, पंचायत समितीचे सभापती हनुमंत चरडे, नगर परिषद गटनेते प्रशांत ठाकुर, कृषी उत्‍पन्‍न बाजार समितीचे माजी सभापती संदीप काळे, बुथ अभियान प्रमुख अशोक विजयकर, जिल्‍हा परिषद सदस्‍य कांचन नांदूरकर, भाजपा शहर अध्‍यक्ष जगन घाटे, तालुकाध्‍यक्ष राजाभाऊ ठाकरे, सुनिल गफाट, वैभव जगताप, मनोज कसर आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, जो पर्यंत संघटन मजबुत होत नाही तोपर्यंत स्‍वस्‍थ रहायचे नाही. कार्यकर्त्‍यांच्‍या परिश्रमाच्‍या बळावर आपण तीन खासदारांवरून तीनशे तीन खासदारांपर्यंत पोहचलो आहे. देशहिताचा विचार जनाजनाच्‍या मनामनापर्यंत पोहचविण्‍याची आवश्‍यकता आहे. बुथ सक्रीय होणे, त्‍यानंतर पेजप्रमुख तयार करणे गरजेचे आहे. शक्‍तीकेंद्र प्रमुखांनी त्‍यांची बैठक घेवून आदर्श बुथ रचना तयार करणे हे संघटनेच्‍या दृष्‍टीने अतिशय गरजेचे आहे. प्रत्‍येक बुथवर सातत्‍याने छोटे छोटे कार्यक्रम करून त्‍या माध्‍यमातुन जनजागरण करण्‍याची आवश्‍यकता आहे. सोशल मिडीया हे आज अतिशय प्रभावी माध्‍यम आहे. या माध्‍यमाचा संघटन बांधणीसाठी योग्‍य वापर करत सोशल मिडीयाचे ग्रुप तयार करण्‍याचे आवाहन आ. मुनगंटीवार यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी बोलताना आ. दादाराव केचे यांनीही बुथप्रमुखांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला आर्वी तालुका भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बुथप्रमुख यांची उपस्थिती होती.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *