◼️ गझल …
गणित अवघेच उलटे झाले बोंडअळीने
धुळीस सारे स्वप्न मिळाले बोंडअळीने
घाम सांडला,रक्त आटले,सगळे केले
छदामही ना हाती आले बोंडअळीने
अच्छे दिन ची केली आशा काय फायदा ?
जुमलेबाजच वर्ष निघाले बोंडअळीने
तुझी कशाला आळवणी मी करू पावसा
पाण्यात असे कष्ट बुडाले बोंडअळीने
भविष्याचाच कुठे भरवसा शेतीमध्ये ?
वर्तमानही दूर पळाले बोंडअळीने
त्यालाच पुसा कशी नेमकी असते शेती
देखत ज्याचे रान जळाले बोंडअळीने