◼️झाले मन उदास
झाले मन उदास
तु नाही आलीस
प्रेमाच्या वाटेवर
तु नाही भेटलीस
एवढ्यात विसरलीस
दिलेले वचन
सांग ना मला
याचे कारण
प्रेमात तुझ्या मी
तुझाच विचार करी
वेळ कसा जायचा
कोण विचारी?
तुजविण आता
पदोपदी काटे
जुन्या आठवणीत
काळीजही फाटे
ते तुझे हसणे
मला ओढ लावी
आता झालो फक्त
लेखणीविणा कवी
कुठे शोधू तुला
कळू दे काही
आता या जिवनात
काही अर्थ नाही…!
मो. 9373675398
◼️🔴◼️🔴◼️🔴◼️🔴◼️🔴◼️🔴◼️🔴◼️🔴◼️