माणसा सारखा व्यवहार कर
माणसा माणसा जागा हो
माणुसकी जीवनात भर
जगी जीवनाचे सार समजून
माणसासारखा व्यवहार कर
राग काम द्वेष मत्सर
दूर करायला हवे
माणसाने माणसाशी
माणसाप्रमाणे वागायला सवे
धर्म जात पंथ संप्रदाय
विसरून सारे भेदाभेद
माणसासारखा व्यवहार कर
आठवून सारे वेद
विकृतीला दूर कर
मानवतेचा धर्म मोठा छान
साधू संताची शिकवण आठव
सृजनशील विचार हवे महान
एकमेका साहाय्य करू
प्रेम नम्रता शीलता वाढव
अवघे धरू सुपंथ छान
माणसासारखा व्यवहार साठव
मूक प्राण्यांनाही कळते
सृष्टी नियमांचे पालन करतात
माणसासारखा व्यवहार कर
सद्गुरु परमार्थ शिकवतात
◼️”सौ.भारती दिनेश तिडके, गोंदिया
8007664039