कवी विमित दहिवले यांच्या “माता रमाई” कवितेला प्रथम पुरस्कार
सिंदेवाही : त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंती निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचार मंच महाराष्ट्र आयोजित राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेमध्ये कवी वीमित अशोक दहिवले यांच्या “रमाई” या कवितेला प्रथम पुरस्कार प्राप्त झाला आहे.
कवी विमीत दहिवले हे मिनघरी, ता. सिंदेवाही, जि. चंद्रपूर या छोट्याशा गावात राहणाऱ्या कवीला हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व मित्र परिवार तसेच वाचक, कवी ,आणि साहित्यिक स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
“त्यागमूर्ती माता रमाई” या विषयावर ही स्पर्धा ६ फेब्रुवारी २०२१ रोजी ऑनलाइन कविता पाठवून आयोजित करण्यात आली होती. आणि ७ फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. या ऑनलाइन लेखन स्पर्धेचे परीक्षण रीया पवार, मुंबई ,अस्मिता सावंत, ठाणे ,भावना खोब्रागडे, चंद्रपूर यांनी केले.
कवी विमीत दहिवले यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आशिष श्यामकुळे, निखिल चहांदे, श्रीकांत रामटेके, क्षितीज मेश्राम तसेच “आमचा गाव आमचा विकास” समितीचे हेमंत बन्सोड, लखन नन्नावरे, प्रज्ञाशील रामटेके आणि सर्व मित्र परिवाराकडून शुभेच्छा देण्यात आल्या.◼️