◼️ काव्यरंग : नाते माणसाशी तोडू नको

नाते माणसाशी तोडू नको

नाते माणसाशी तोडू नको
आपुलकीने वागायला शिक
जरी पदरी आले असतील काटे
तरी मात्र निट वागायला शिक

दुनियेची या रीत निराळी
माणुसकीला इथे भुल पाडी
लोकांचे कटू शब्द
या जीवनी गिळायला शिक

मान – सन्मान, विचार – आदर
दुःखाची इथे ओढून चादर
सुखा – दुःखात, सोबत त्यांच्या
साथ देत रहायला शिक

भांडण – तंटे असतात इथे
कपट – विडंबना असते इथे
भोवताली असते कर्मठांची लहर
या लहरीतून पोहून जायला शिक

सन्मानाने जगणे, सन्मानाने रहाणे
या समाजात आता झाले पुराणे
रंग वेगळा; यांची भाषा वेगळी
यांच्याच भाषेत बोलायला शिक

◼️ पुनाजी नारायण कोटरंगे
गायडोंगरी, सावली, चंद्रपूर
मो. 9373675398

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *