धनराज गमरे युट्युब चॅनल वर राज्यस्तरीय कविता स्पर्धेच आयोजन

धनराज गमरे युट्युब चॅनल वर राज्यस्तरीय कविता स्पर्धेच आयोजन
ठाणे : ७ फेब्रुवारी :  धनराज गमरे युट्युब चॅनेल राज्यस्तरीय कविता स्पर्धा – २०२१ आयोजित करण्यात आली या मध्ये भाग – १ ही स्पर्धा ११ वी विज्ञान शाखेतील धनराज संदेश गमरे , जिल्हा – ठाणे या विद्यार्थ्याने आयोजित केली होती . या स्पर्धेसाठी परीक्षक सौ. कवयित्री रिया रुपेश महाळुंगेकर दहिसर , मुंबई यांनी परीक्षण केले .

११ जानेवारी ते ३१ जानेवारीपर्यंत आयोजित करण्यात आली होती . त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्र राज्यातून ६० जणांनी सहभाग घेतला होता आणि याचा १ फेब्रुवारी ला निकाल जाहीर करण्यात आला.
ह्या निकाल मध्ये प्रथम क्रमांक – सौ. श्रुती चंद्रशेखर दिवाडकर (मुंबई) यांनी पटकवला तर
द्वितीय क्रमांक – मा. श्री. लक्ष्मण शिंदे(पुणे)
तसेच, तृतीय क्रमांक – कु. नेहा दिलीप यादव (रत्नागिरी) यांनी मिळविला तर उत्तेजनार्थ म्हणून १)मा. श्री. सागर पुंडलिक बेलुरकर (बुलढाणा), २)डॉ. सौ. प्रतिभा महेश झगडे (पुणे), ३)मा. श्री. युवराज खलाटे (बारामती) यांनी मिळविला.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *