◼️ काव्यरंग : त्याग मूर्ती रमाई

◼️त्याग मूर्ती रमाई


भीमा ..
तू नव्या तेजाने तळपणारा दीपक,
अन् रमाई तुझीरे जळणारी‌ वात,
घाम गाळूनी देहाचा, जाळे स्वतःला,
लेखणीच्या विरामावरी, राहे रमाई तेवत..

कष्ट ‌ते सोसूनीया, रक्ताचे पाणी केले,
अहोरात्र परिश्रमात जळणे निरंतर राहीले,
चंदनापरी रमाईने स्वतःस झिझवले,
तेव्हाच..
काळोखाचे साम्राज्य लेखणीने प्रकाशमय झाले.

मोल न या जगात, रमाईच्या त्यागाचे,
जखमा बाबांना , दुःख दोघांना होत,
हिंमतीने, विश्वासाने एकमेकांना सावरत,
चटणी भाकर खाऊनी, स्वाभिमानाने जगत.

भीमा तुच सर्व अलंकार, तूझ्या शब्दांना रमाईमुळे धार,
हातातली लेखणीच तुझे प्राण, तूझी तलवार,
समस्त संसाराचा रमाईने केला उद्धार…

नवा इतिहास घडवणारा,
तू एकच परमेश्वर,
त्यांगाच्या भट्टीत तापणारा, श्रेष्ठ तुझे विचार,
तुला क्रांतीसुर्य करण्यासाठी, रमाईचे कष्ट अपार,
जाती भेद, वर्ण भेद, मिटवून तू झालास प्रखर.

✍️✍️नितू.
◼️नितेश शि खरोले.शिक्षण.11सुरू.
रवींद्र विद्यालय महाविद्यालय चोपा.
गोंदिया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *