◼️ काव्यरंग : कायल तुझे हे डोळे

💕कायल तुझे हे डोळे

कायल तुझे हे डोळे ।
प्रेमात मन हे भोळे ।।

स्वप्नात माझ्या येऊनी तू ।
अंगाला स्पर्श करुनी तू ।
अंग माझे तू छळे ।।

नजरेच्या तिरांतुनी तू ।
भुवयांच्या लहरांतुनी तू ।
लहर माझी तू मोळे ।।

गाण्याच्या बोलाने तू ।
प्रेमाच्या शब्दाने तू ।
शब्द माझे तू चोळे ।।

फुलांच्या कळ्यांतूनी तू ।
हवेच्या झोक्यांतूनी तू ।
श्वास माझा तू सोळे ।।

आकाशी मेघांतुनी तू ।
चंद्रापरी चांदण्यातुनी तू ।
प्रेम तुझा रे रोळे ।।

◼️ पुनाजी नारायण कोटरंगे
गायडोंगरी, सावली, चंद्रपूर
मो. 9373675398

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *