◼️ काव्यरंग : आठवणिंच्या दुनियेतला प्रवास…

🔴  आठवणिंच्या दुनियेतला प्रवास…

पाखरे घरट्यात परतु लागली
कदाचित आपलीही जायची वेळ झाली होती..
माझं लक्ष होत तुझ्याकडे
तुझ्या डोळ्यातील आसवांची सर मी टिपली होती..
खांद्यावर डोक ठेऊन माझा नवाकोरा शर्ट
तुझ्या आसवांच्या थेंबान भिजला होता..
माझा हात तुझ्या कोमल हातात घट्ट पकडत होतीस..
मला माहीतेय तुझ मन मानत नव्हत
आणि माझ गं वेडे..
तुझ्या लांबसडक काळ्याभोर केसांना कुरवाळणारा
प्रवास आता थांबला होता..
विचारांच्या लाटा मनात बेभान उसळी घेत होत्या..
वेडे मी तुझाच आहे हां शेवटपर्यंत
घरी जा निवांत हो.. जरासी उसंत घे
डोळे उघड कदाचित मी तुझ्या नजरेसमोर असेन..
दार उघड दारात मी उभा असेन..
एक हलका श्वास घे त्यात मी असेन..
नाहीच रहावल कदाचित..
तर कपभरुन मनसोक्त चहा पी..
दुधाचा, बिनदुधाचा करतरीत पाण्यात
तावुन निघालेला साखरेचा रस मनसोक्त पि..
तुझ्या टि लवरच्या आठवणित..
बघ जमतय का..

◼️विमीत अशोक दहिवले
     मु-मिनघरी ता-सिंदेवाही, जि-चंद्रपुर
     ९६३७५५८६२७

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *