◼️ काव्यरंग : ठिणगी

🔴 ठिणगी

कधी कधी अवचित पणे
नात्यामध्ये ठिणगी पडते
क्षणात जातो तडा अन्
होत्याचे नव्हते घडते !

सुखी समाधानी संसार
पण बेचिराख होतात क्षणात
मतभेदाची अढी माजते
प्रत्येकाच्या मनामनात !

आईवडिल,भाऊ बहिण
नाती असतात अनमोल
होऊ देऊ नका त्यांना
कधीसुद्धा कवडीमोल!

गैरसमजाची ठिणगी विझवा
वेळीच शहानिशा करून रास्त
तरच भडकणार नाही वणवा
अन् होणार नाही घर उध्वस्त !

मनमोकळा संवाद साधून
करू मनातील संशय दूर
तरच छेडता येतील जगी
सौख्य समाधानाचे सूर !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *