वैचारिक लेख : आई


आयुष्यात आपलं कोणी जर असेल तर ते असतात आपले आई बाबा अन सर्वांहून अधिक लेकरांवर प्रेम करणारी आपली आई. आईचं वर्णन करायला शब्दाचा सागर जरी आणला तरी तो कमीच पडेल आई या शब्दात जेवढं सामर्थ आहे,तेवढं या धरती वर कुठेच नाही. प्रेत्येकाला दुःख झालं की कळत नकळत आई हा शब्द तोंडातून निघतो त्या शब्दातच एवढी ताकत आहे की सर्व दुःखाला तो नाहीस करून टाकतो. आई हा शब्द तोंडातून निघताच सर्व काही दुःख विसरून जाते. फक्त सुखं आणि आनंदच भरला आहे आई या शब्दात.जो तो व्यक्ती कितीही गरीब असो पण आईच्या नजरेत तो एक राजाच असतो अन खरंच श्रीमंत असूनही फायदा नाही. ज्याच्याकडे आई आहे तोच खरा श्रीमंत आहे. जो आईची सेवा करतो तोच खरा श्रीमंत आहे.आई वर लिहायला जावं तर अगदी साहित्य क्षेत्र देखील पुरणार नाही एवढा मोठा आईचा महिमा असतो.आई पाशी लेकरू होऊन लाड घालतो तेव्हा जो आनंद मिळतो तो आनंद कुठेच मिळत नाही. नेहमी वाटतं की परत आपण लहान व्हावं आईच्या ममतेने आयुष्य सुखी व्हावं. ज्याला आई कळली त्याचं जीवन अगदी सार्थक झालं असं समजणं देखील योग्यच ठरेल. गरीबातील गरीब लेकरांना आई ज्याच्या पाठीशी आहे तोपर्यंत त्या लेकराला काही कमी नसतं आई स्वतः उपाशी राहून मात्र लेकराला पोटभर खाऊ देते. असचं आई मनता लेकरांला कसं तरी व्हायला लागतं त्याला आई शिवाय करमत नाही, स्वर्ग देखील खालीच आहे पण ते ओळखनारालाच कळते ज्याच्या पाशी आई आहे तेच स्वर्ग आहे मात्र हे त्याला कळायला हवं. आई कसलीही असो मात्र ती सोबती असतांना तिच्या लेकराला जवळ यायला काळ ही घाबरतो,आईच्या पुण्याईने लेकराला सर्व काही भेटते . ज्या वेळेला लहान असतो तेव्हा आपली आई
थोडी जरी दूर गेली तरी एक क्षण ही लेकरांला करमत नाही. आई- आई म्हणून रडत ओरडत ते आई पाशी जातं, जेव्हा आई त्याला दिशेल तेंव्हाच ते शांत होतं, खरंच ज्याला आई आहे ना तोच या जगातला सर्वांत भाग्यवान आहे.असचं प्रत्येकाला प्रेत्येकाच्या आई बद्दलच प्रेम व्यक्त करावं वाटतं. आई ही जन्मदाती असते तिचे उपकार कधीच फीटू शकत नाहीत. कितीही उपकार फेडण्याचा प्रयत्न केला तरी ते फिटणार नाहीत. सर्वांचे व माझं आयुष्य देखील असं म्हणता येईल. मला ही माझी आई खुप संम्भाळ करते येवढेचं नव्हे तर मला लेकरू म्हणून माननारी देखील एक जननी माझ्या आयुष्यात देवाच्या रूपाने मिळाली अगदी पोटच्या लेकरांसारखी संभाळ करणारी परक्याची कधीच जाणीव न होऊ देणारी माझी शालू आई, शालू आई बद्दल लिहावं तेवढं कमीच पण त्या मातेसमोर अगदी लहान लेकरू व्हावं वाटते आयुष्यातले बालपणीचे ते दिवस परतुनी आले की काय असं वाटतं, खरंच आईला लेकराची किती काळजी असते ते तिच्याकडुन पहायला मिळालं जगात सर्व श्रेष्ठ आई लेकराचं नातं काय असतं यांची जाणीव आईने करून दिली. खरंच म्हणतात कितीही मोठयातला मोठा असला तरी तो आई पुढे झुकतोचं असं माझ्याही आयुष्यात झालं मोठा जरी झालो तरी त्या आईपुढं लेकरू होऊनचं जावं वाटतं नेहमी. बालपनी जी आई असते अगदी ते दिवस आयुष्यात परत आल्यावाणी वाटतं आईशी नेहमीच बोलावं वाटतं आईवर रुसावं वाटतं जेव्हा लहानपणी काही आई कडून घ्यायचं असलं तर लेकरू आईवर रुसलं की आई त्याची समजूत घालून त्याला हवं ते खाऊ देतं असते आईवर रुसल्यावर त्या लेकराचे लाड आई पुरवत असते.आई हा शब्द जेव्हा घेतो तेव्हा माझं मन अंतःकरनातू भरून येऊन आनंदान फुलून जाते.देव शालू आईच्या रूपाने जणू माझी हाक एकूण माझ्या सोबत आहे की काय असं कधी कधी वाटतं लहान पणी आई लेकरांचं रुसणं वगैरे होतंच असते पण जेव्हढं रुसणं होईल तेवढं नातं घट्ट होतं जाते. माझ्या शालू आई साठी काय वर्णन करू, माझे शब्दच अपुरे पडायला लागले की काय असं वाटतं. आणि हो खरंच आईचं वर्णन करायला कोणत्याही लेकराकडे शब्द नसतात. शेवटी माझ्या आईमुळे बालपणचे दिवस परतून आले,आयुष्यात हेच माझ्या साठी खुप काही आहे. मी माझ्या शालूआईला आयुष्य भर विसरणार नाही,बाबांनो तुंम्ही आपल्या आईला कधीच विसरू नका म्हतारपणी आईची सेवा करा त्यातच ईश्वर सेवा आहे, जन्म एकदाच आहे आई ही एकदाच मिळते आई म्हणेज ईश्वर आहे मंग आईचीच सेवा करा. आई बाबाची वाटनी कधीच करू नका एकत्रच कुटूंब चालवा. आपल्या संवसारा साठी आईबाबाचा संवसार उध्वस्त करू नका त्यांचा संवसार म्हणेज आपण मुले मात्र आपण वेगळे राहिलो तर त्यानां ते दुःख पचवता येणार नाही.लहान पणी आई-आई करून ओरडनारे आपण पण आईला मोठयापनी कसे विसरून जातो हिचं खुप मोठी शोकांतिका आहे, त्यामुळे सर्वाना हात जोडून विनंती आपल्या आई बाबाचा संभाळ करा त्यातच जन्माचा उध्दार आहे आई बाबाच आपले देव आहेत, जो आई बाबाची सेवा करेल तोच सदैव सुखी राहतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *