◼️ मर्मबंध लेख : तिची माझी भेट

भेट तिची माझी

तिची माझी भेट रॉंग नंबर वर झाली…!!
तिच्यासाठीच मी व्हाट्सअप वर online यायला लागलो..
कधी कधी नव्हे तो आता दिवसभर बसायला लागलो…
माझ्या स्टेटस ला ती खूप कमेंट्स करायची
कमेंट्स करून मला जवळचे ती मानायची ….
9 दिवसाने कुठे फोन वर बोलू लागलो..
कुणाशी नव्हे ते आता तिच्याशीच बोलू लागलो
ती आता मला जवळची वाटू लागली..
तिचेच गाणे आता माझ्या मनात हि येऊ लागले.. 
मी तिला प्रोपोज केला !
तिचा होकार मिळाला..
मी कामात असायचो
पण तिला करमायचे नाही….
थोड्या थोड्या वेळात मला फोन सारखी करायची
कसा आहेस म्हणून मला ती बोलत बस म्हणायची
माझ्या प्रत्येक शब्दावर ती मनापासून हसायची
कधी मानस लागले तर ती हुंदक्यात रडायची
मग तिला लांबूनच जवळ घ्यायचो
उगी उगी म्हणत तिला तू माझी बायको म्हणायचो ….
रडताना खरच ती मला हि रडवायची
रडायची ती अन श्वास माझा फुलवायची
तिच्या फोन ची मलाही सवयच होती झाली
फोनशिवाय तिच्या आता झोपच लागत नव्हती
तिची मला जणू आता सवयच लागली होती
भेट तिची माझी होईल अशी मला वाटलेही नव्हते..
माझी होईल ती स्वप्नातही वाटले नव्हते
2 महिने झाली तेव्हा कॉलेजमध्ये भेट आमची झाली 
तिला मला पाहून सारे प्रेमच समजू लागले
माझी प्रियसी मनून कधी कमी केले नाही
मग काही दिवसांनी आम्हाला एकमेकांच्या दूर राहणे खूप कठीण झाले.(कोरोना मुळे)
आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला.
घरचे लग्नाला तैयार नव्हते.(जात नावाचा कलंक मधात आला )
तर आम्ही पळून जाऊन लग्न करण्याचं ठरविलं ती पळून जाऊन माझ्याशीं लग्न करायला तैयार होती.
ज्या दिवशी आम्ही पळून जाणार होतो त्या दिवशी नियतीने आम्हाला साथ नाही दिली.
तिच्या घरच्यांना कळलं की ती पळून जाणार आहे म्हणून.
तीला घराच्या बाहेर निघू नाही दिले.
त्या दिवसा पासून आमचा कॉन्टॅक्ट बंद झाला.
अधामधात ती बोलायची मी तुझाशिस लग्न करते पण आता थोडा वेळ लागेल मला तुझ्याकडे यायला मानायची.
मी वाट बघू लागलो त्या वेळेची.
तीच नाव मी माझ्या छातीवर आणि हातावर गोडवील.
मग काही दिवसात ती वेगळी वागू लागली
तिची एक एक सवय मी जणू लागलो होतो
तिचे असे वागणे मला जखमी केले होते
मग वाटले तिला काय म्हणू मी
तिनेच मला आता दूर केले होते
मी हि गेलो दूर तिला
हसत ठेवायला कुणासोबत हि रहा
पण डोळ्यात अश्रू नकोत म्हणायला
तिच माझ्यावरच प्रेम आता संपून गेल होत
माझ्याही मनात आता अमावस्या झाली होती
काळोखच काळोख माझ्या मनातही झाला
थोड्याच वेळात कधी नव्हे ते सुख मी बघितले ..
तू माझी होतीस..
मी आज हि तेच मानतो
तुझे प्रेत्यक शब्द माझ्या हृदयात आजही साठवतो ..
तुझ्या येण्याच्या आशा आता नाहीशा झाल्यात
तुझ्यचं साठी मी कित्येक रात्री जागल्यात…

जमलेच तर ये मी आजही वाट बघतोय…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *