◼️ काव्यरंग : बळीराजाची हाक

बळीराजाची हाक

नाही पिकविमा यंदा
किती काढावेत कर्ज
जीव गेला दमुनिया
रोज करूनिया अर्ज…..!!

नाही शेतमाला भाव
गेली कंबर मोडून
ऐक शासना ग-हाणं
दोन्ही हात रे जोडून….!!

झाले सावकारी कर्ज
नको झाला आता जीव
शेतकरी पोशिंदा तो
कशी नाही येत कीव…..!!

लाईनबील ते अमाप
आता कशानं भरावं
पोरंबाळं जगवावं
की उपाशीच मरावं……!!

सा-या जगाचा पोशिंदा
ऐक बळीराजाची हाक
नको करू हेटाळणी
नको रोजचाच धाक…..!!

कवयित्री कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे
मु.पो.कोकलगाव, ता.जि.वाशिम, पी.444505
 मो.9767663257
मेल mpn1412@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *