◼️ काव्यरंग : नव्हत्याचे आहे झाले..!

नव्हत्याचे आहे झाले..!

यश आले अपयश आले
दुःखाचा मग अंत झाला
गाठली शिकरे यशाची
मग कुठे तो यशवंत झाला

मान झाला अपमान झाला
कधी कधी सन्मान झाला
राज्य केले लोकांच्या मनावर
मग कुठे तो गुणवान झाला

जय झाला विजय झाला
नाही कशाचा हाव झाला
नांदली लक्ष्मी घरी
मग कुठे तो धनंजय झाला

हार झाली पराभव झाला
कधी कधी पराजीत झाला
जिकले प्रेमाने जग सारे
मग कुठे तो अजित झाला

कालपर्यंत होता भामटा
आज तो संत झाला
पुजले पाषाण कुणीतरी
मग कुठे तो भगवंत झाला

शब्दसाज-अजितराजे थोरात
तुळजापूर(धाराशिव)
मो नं 7620426330

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *