◼️ काव्यरंग : जगणे झाले कठीण

जगणे झाले कठीण

जगणे झाले कठीण ना राहिले काही बाकी
पोटासाठी मले माय थोडासा तरी दे की

आकाशाच्या छत्राखाली थाटीले संसार
हितभर पोटासाठी फिरते दारोदार

काम – धाम करतो म्हटला तर नाही मिळत नोकरी
बायको – पोरासाठी मला द्या ना हो भाकरी

हातात गाडगा धरुन फिरतो गावोगाव
शेर भर नाही मुठभर तरी द्या ना मले राव

फाटक – तुटक कापडं पाहुनी वेडा समजी लेकरं
कधी – कधी शहाणी सुद्धा समजी मला चोर

नाही पाहिजे पैसा तुमचा, नाही पाहिजे मोठी संपत्ती
काय करु या पैशाचा माझा रखवला कैलाशपती

तोच कर्ता, तोच धरता, तोच माझा कैवारी
कधी – कधी त्याच्याच दारी; भिक मागीतो हा भिकारी

🔴 पुनाजी नारायण कोटरंगे
गायडोंगरी, सावली, चंद्रपूर
मो. 9373675398

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *