बोदली-गडचिरोली मार्गावर जंगली डुकराच्या जबर धडेत पलटला प्रवासी ऑटोरिक्षा

बोदली-गडचिरोली मार्गावर जंगली डुकराच्या जबर धडेत पलटला प्रवासी ऑटोरिक्षा

भाजी विक्रेत्या तीन महिला गंभीर तर अन्य किरकोळ जखमी

गडचिरोली : दि.१४ फेब्रु. (चंद्रपूर सप्तरंग, वार्ताहर – श्री कृष्णकुमार निकोडे – ९४२३७१४८८३) एका प्रवासी ऑटोरिक्षाला बोदली-गडचिरोली या महामार्गावर जंगली डुकराची जबर धडक बसली. त्यात ऑटोरिक्षा पलटून भाजी विक्रेत्या तीन महिला गंभीर तर अन्य किरकोळ जखमी झाले.
बोदली गावावरून प्रवासी घेऊन गडचिरोलीकडे निघालेल्या ऑटोरिक्षाला जंगली डुकराच्या जबर धडकेने अपघात झाला. ही घटना रविवार दि.१४ फेब्रुवारी २०२१ रोजी सकाळी ७-३० वा.सुमारास बोदलीपासून सुमारे २.५ किमी.अंतरावर घडली. डुकराच्या जबर धडकेने वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण बिघडल्याने ते रस्त्याच्या कडेला जाऊन पलटले. त्यातून प्रवास करणाऱ्या भाजी विक्रेत्या तीन महिला गंभीर जखमी झाल्या. त्यात संगिता नाकतोडे, सुंदरा आवळे व भागाबाई मोहूर्ले सर्व राहणार बोदली यांचा समावेश आहे. त्याबरोबरच अन्य प्रवासी किरकोळ जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने गडचिरोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आल्याचे कळते.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *