विद्यालयेही होणार सुरू शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाने जारी केले आदेश

सोमवारपासून कृषी महाविद्यालयेही होणार सुरू
शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाने जारी केले आदेश

गडचिरोली : दि.१३ फेब्रु. (चंद्रपूर सप्तरंग, वार्ताहर : श्री कृष्णकुमार निकोडे – ७७७५०४१०८६) राज्यातील अकृषी विद्यापीठे तसेच महाविद्यालये सोमवार दि.१५ फेब्रुवारीपासून सुरू करण्यासंदर्भात शासनाने परिपत्रक काढले. त्यादृष्टीने तयारी सुरू असतानाच आता शासनाच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाने दि.१२ फेब्रुवारी २०२१ रोजी आदेश जारी करून सोमवार दि.१५ फेब्रुवारी २०२१पासून सर्व कृषी विद्यापीठे व कृषी महाविद्यालये सुरू करण्यास त्यातून सुचविले आहे. त्यामुळे येत्या सोमवारपासून सर्वच प्रकारची महाविद्यालये विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलणार आहेत.
कोव्हिड-१९च्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आले होते. त्यामुळे शैक्षणिक संस्थांचे दैनंदिन कामकाज मार्च २०२०पासून विस्कळीत झाले. सद्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली असून सद्यस्थितीत ही साथ नियंत्राणाखाली आल्याची चित्रे दिसून येत आहेत. त्या अनुषंगाने उच्च व तंत्र शिक्षण विभागाने दि.३ फेब्रुवारी २०२१ रोजी परिपत्रक काढून सर्व अकृषी विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयं अर्थसहाय्यित विद्यापीठे व त्यांच्याशी संबंधित महाविद्यालयांचे नियमित वर्ग दि.१५ फेब्रुवारी २०२१पासूनच सुरू करण्यास मान्यता दिली. त्यामुळे आता सर्वच कृषी विद्यापीठे व त्यांच्याशी संलग्नित शासकीय, खाजगी विना अनुदानित विद्यालये व महाविद्यालयांचे नियमित वर्ग हे सुद्धा दि.१५ फेब्रुवारी २०२१पासून सुरू करण्यास मान्यता दिली आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *