उसवलेली वीण…..
चौ-याऐंशी लक्ष योनी
फिरुनी मिळतो मनुष्य जन्म
किती अजब हे दैवी देणं
धन्य-धन्य मानवी जीणं…..
जन्माला आलेपासुन
शिकवलं फक्त कर्म अन् कर्तव्य
देह झिजवत राही
सर्वांचीच केली उतराई…..
मनाच्या इच्छा-आकांक्षाला
तिलांजली दिली क्षणा-क्षणाला
परी मोल ना कळले नात्याला
झुरणी लागली जीवाला…..
वेळ,पैसा खर्च केला
प्रत्येकाचा शब्द हाती झेलला
नात्या नात्यात मेळ बसवला
हास्याचा मळा फुलवला…..
अंती वाटले धन्य झालो रे
एकत्र आणले सगे-सोयरे
पण अहंकाराच्या तो-यानं
नात्या नात्याची उसवली वीणं…..