◼️ काव्यरंग : गणेश वंदना

गणेश वंदना

दु:खहर्ता सुखकर्ता
गणपती बाप्पा माझे छान
विघ्नहर्त्याला करु नमन
स्वागत करूया महान

बाप्पा मोरया ला
सुरेख नैवेद्याचा मान
वक्रतुंड त्रिनयना
दुःख हरेल छान

मोदकाचा प्रसाद
गणपती रायाला
आनंदी वातावरण
तिलकुंद प्रहरी ला

शेंदूर लाल चढवून
करूया पूजा गोडीची
विनायक सिद्धी विधाता
वाहुनिया जोडी दुर्वाची

बुद्धीची तू देवता
शमीपत्र वाहिले
शंकर पार्वतीच्या बाळा
प्रसन्नचित्त पाहिले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *