◼️ काव्यरंग : माझा प्राण

 माझा प्राण

माझा देश माझी शान
माझा देश माझा मान

मला नको सोना चांदी
हा देश सुखाची खाण

काय मागु रे देवा तुला
तु दिला-देश मला दान

का मारावी हाक रे मी
हा देश ऐकणारा कान

मि न माझा नव्हतोच रे

माझा देश जिवाचं रान

प्रेमात कुणाच्या कसं रंगु
मि सदाचा तिरंगी बेभान

देशा काय वर्णु रुप तुझे
तिरंग्या तुच माझा प्राण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *