गुणवत्ता विकासासाठी बालभवन उपयुक्त ! भेंडाळाचे केंद्रप्रमुख मा.पंचफुलीवार यांचे प्रतिपादन

गुणवत्ता विकासासाठी बालभवन उपयुक्त !

भेंडाळाचे केंद्रप्रमुख मा.पंचफुलीवार यांचे प्रतिपादन

गडचिरोली : दि.१७ फेब्रुवारी (चंद्रपूर सप्तरंग, जिल्हा प्रतिनिधी – श्री कृष्णकुमार जी. निकोडे – ७७७५०४१०८६) तालुका चामोर्शी अंतर्गत येणार्‍या भेंडाळा केंद्रातील बालभवनात विविध साहित्याची भर घालण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात या अध्यापनातून भर पडणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी बालभवन उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन भेंडाळा केंद्राचे केंद्रप्रमुख मा.पंचफुलीवार यांनी केले.
पंचायत समिती चामोर्शी अंतर्गत भेंडाळा केंद्रात येणाऱ्या जि.प.प्राथमिक शाळा मोहोर्ली (मो.) येथे फुलोरा क्षमता विकास कार्यक्रम राबविला जात आहे. त्या अंतर्गत मुख्य कार्यपालन अधिकारी यांच्या प्रेरणेतून नुकतेच बालभवनाचे उद्घाटन करण्यात आले. ‘बालभवनात विविध साहित्याची भर घालण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात अशा अध्यापनाने भर पडेल. त्यामुळे साहजिकच विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी बालभवन उपयुक्त ठरणार आहे’, असे त्यावेळी भेंडाळाचे केंद्रप्रमुख मा.पुरुषोत्तम पंचफुलीवार बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शा.व्य.समितीचे अध्यक्ष मा.सुधीर चेलीरवार तर उपाध्यक्ष साधनव्यक्ती मा.रवींद्र खेवले होते. प्रमुख पाहुणे शा.व्य.समिती सदस्य मा.सदानंद जवादे, मा.ताराचंद साखरे, मा.मुनेश्वर राऊत, मा.सोनिताई कुळमेथे, मा.माधुरी मांडवकर, अंगणवाडी सेविका मा.ज्योतिताई बेजंकिवार, मा.कमलबाई परगडपल्लीवार, मुख्याध्यापक मा.मारोती आरेवार, शिक्षिका दुर्गा सिडाम आदी उपस्थित होते.
यावेळी संचालन शिक्षक मिलिंद घायवट यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक मा.मारोती आरेवार यांनी केले.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *