आष्टीत ६५० विद्यार्थ्यांनी दिली सामान्यज्ञान स्पर्धापरीक्षा, शिव जन्मोत्सवाचे औचित्य : शिवमुद्रा मंडळाचा पुढाकार

आष्टीत ६५० विद्यार्थ्यांनी दिली सामान्यज्ञान स्पर्धापरीक्षा

शिव जन्मोत्सवाचे औचित्य : शिवमुद्रा मंडळाचा पुढाकार

गडचिरोली : दि.१७ फेब्रुवारी (चंद्रपूर सप्तरंग, जिल्हा प्रतिनिधी : श्री कृष्णकुमार निकोडे – ९४२३७१४८८३) चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे तब्बल ६५० विद्यार्थ्यांनी विशेष सामान्यज्ञान स्पर्धापरीक्षा दिली. शिव जन्मोत्सवाचे औचित्य साधून स्थानिक शिवमुद्रा मंडळातर्फे सदर स्पर्धापरीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.
स्पर्धेचे उद्घाटन ग्रा.पं.सदस्य मा.राकेश बेलसरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ग्रा.पं.सदस्य मा.कपिल पाल, मा.संतोष बारापात्रे, मा.प्रा.रवींद्र इंगोले, शिवमुद्रा मंडळाचे अध्यक्ष मा.पावन रामगिरकार, सचिव मा.सुमित कुकुडकर, उपाध्यक्ष मा.संदीप तिवाडे, कोषाध्यक्ष मा.पिनू चतुर, मा.सुधीर फरकाडे, मा.गणेश शिंगाडे, मा.मंगेश पोरटे आदी उपस्थित होते.
महात्मा जोतिबा फुले हायस्कूलच्या पटांगणात सकाळी ९ ते १०.३० या वेळेत ही सामान्यज्ञान स्पर्धापरीक्षा घेण्यात आली. इयत्ता ५ ते ८वी ‘अ’ गट आणि इयत्ता ९ ते १२वी ‘ब’ गट या दोन गटांमध्ये ती घेण्यात आली. आष्टीच्या सर्व शाळांतील ६५० विद्यार्थ्यांनी या स्पर्धापरीक्षेला उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. विजयी स्पर्धकांना ,येत्या १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जन्मदिन बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
सदर स्पर्धापरीक्षेच्या यशस्वीतेसाठी मंडळाचे मा.आकाश लोडेल्लीवार, मा. सूरज सोयाम, मा.अश्विन लांजेवार, मा.गणेश चौधरी, मा.अंकित उरकुडे, मा.विशाल मंडल, मा.परेश मोहूर्ले, मा.शिवाजी लोणारे, मा.सागर वाकुडकर, मा.राहूल आलचेट्टीवार, मा.अक्षय हनमलवार, मा.चेतन काळे. मा.पावन ठुसे, मा.हर्शल नेवारे, मा.मयूर कोरवते, मा.सूरज कानकाटे, मा.सूरज गोहणे, मा.प्रलय धारणे, मा.चेतन बेलकिवार, मा.अतुल कुकुडकर, मा.अनिकेत बोडे, मा.गोलू पोटवार, मा.चेतन कारेकर यांनी परिश्रम घेतले.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *