मेंढाटोला शाळेतील विद्यार्थिनी कु.रेखा चापलेचा सत्कार

मेंढाटोला शाळेतील विद्यार्थिनी कु.रेखा चापलेचा सत्कार

गडचिरोली : दि.१७ फेब्रुवारी (चंद्रपूर सप्तरंग, जिल्हा प्रतिनिधी : श्री कृष्णकुमार निकोडे – ९४२३७१४८८३) कोरोना काळात प्रथम संस्थेने आकाशवाणी नागपूर केंद्रावर ‘शाळाबाहेरची शाळा’ हा उपक्रम राबविला. त्यात विद्यार्थ्यांना आपले शैक्षणिक विचार मांडण्यासाठी एक स्वतंत्र असे विचारमंच निर्माण करून दिले होते. या कार्यक्रमांतर्गत दुर्गम अशा धानोरा तालुक्यातील मेंढाटोलाच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कु.रेखा विलास चापलेने सहभाग नोंदवला होता. विद्यार्थिनी कु.रेखासह तीचे वडिल श्री विलास चापले व आई सौ.वेणूताई चापले हे १० फेब्रुवारीच्या १०३व्या भागात सहभागी झाले होते. तेव्हा लॉकडाऊनच्या काळात पालकांनी शिक्षकांच्या मदतीने विद्यार्थ्यांचा अभ्यास कसा घेतला? याबाबत त्यांनी माहिती दिली. रेडिओ कार्यक्रमात त्यांना सहभाग घेण्याची संधी मिळाल्याबद्दल शाळेतर्फे कु.रेखा विलास चापले हीचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मेंढाटोला केंद्राचे केंद्रप्रमुख मा.दिलीप मुप्पीडवार, मुख्याध्यापिका मा.अरुणा लांजेकर, शिक्षकवृंद आदी उपस्थित होते.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *