सिरोंचाच्या एसडीपीओचे आवाहन : व्हॉलीबॉल व कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन तरुणांनो ! आपल्या सुप्त कलागुणांतून करिअर घडवा.

सिरोंचाच्या एसडीपीओचे आवाहन : व्हॉलीबॉल व कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

तरुणांनो ! आपल्या सुप्त कलागुणांतून करिअर घडवा.

गडचिरोली : दि.१७ फेब्रुवारी (चंद्रपूर सप्तरंग, जिल्हा प्रतिनिधी : श्री कृष्णकुमार निकोडे – ७७७५०४१०८६) प्रत्येक व्यक्ती ही धावपळीच्या जीवनात वैद्यकीय, कायदेविषयक व अभियांत्रिकी या क्षेत्रांकडे वळण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु आता त्या क्षेत्रातसुद्धा स्पर्धा वाढली असल्याने सर्वांना यश मिळत नाही. आदिवासीबहुल दुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये अनेक सुप्त कलागुण आहेत. या सुप्त कलागुणांतून करिअर घडवावे, असे आवाहन सिरोंचाचे उपविभागीय पोलिस अधिकारी मा.प्रशांत स्वामी यांनी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले.
गडचिरोली पोलिस दल व पोलिस स्टेशन सिरोंचा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बिरसा मुंडा व्हॉलीबॉल व कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले, यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. ही स्पर्धा दि.१६ ते १८ फेब्रुवारी २०२१ अशी तीन दिवस चालणार आहे. याप्रसंगी प्रामुख्याने स्थानिक पोलिस स्टेशनचे प्रभारी पोलिस अधिकारी मा.अजय अहिरकर, पोलिस उपनिरीक्षक मा.धनराज सेलोकर, पोलिस उपनिरीक्षक मा.श्रीकिशन कांदे, महिला पोलिस उपनिरीक्षक मा.शितल धविले, तालुका वैद्यकीय अधिकारी मा.डॉ.मनोहर कन्नाके, वैद्यकीय अधिकारी पेदाला, माजी नगराध्यक्ष मा.मोगलराज पेदाला, शिक्षक मा.वासुदेव दुर्गम, मा.मोहम्मद इरफान आदी मान्यवरउपस्थित राहणार होते.
या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक रोख रक्कम ५ हजार, द्वितीय २ हजार व तृतीय १ हजार असे ठेवण्यात आले आहे. यावेळी संचालन मा.रंजन गागापुरवार यांनी तर आभार प्रदर्शन पीएसआए मा.श्रीकिशन कांदे यांनी केले.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *