◼️ काव्यरंग : सुशिक्षित बेकार

सुशिक्षित बेकार

शिकून-सवरून बघा
नोकरी नाही मिळाली आज
आई-वडिलांनी शिकविले
सुशिक्षित बेकारीचा मिळाला ताज

आई-वडिलांच्या मनी
मुलाला नोकरी लागेल छान
गरिबीतून तारून जाऊ
पैशाची राहिल शान

बेरोजगारीचा भयानक प्रश्न
सुशिक्षित बेकार होतात त्रस्त
वाईट व्यसनांना जवळ करतात
दारू सिगारेट घेतात मस्त

सुशिक्षित बेकार म्हणून
हिणवती सारे जग
लग्नाची पोरगी मिळेना
पदव्यांना मिळाली नाही तग

स्वाभिमान तरुणांचा
जातो बघा लयाला
देशाचा कणा आहे तो
आज दशा येते वयाला

विश्वास ठेवावा स्व:तावर
स्वयंरोजगारावर द्यावा भर
आत्महत्या हा पर्याय नाही
सेवाभावी वृत्ती ठेवावी वितभर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *