गडचिरोली जिल्ह्यात १ मार्चपर्यंत राहणार जमावबंदी : मा. जिल्हाधिकारी यांनी जारी केले आदेश

गडचिरोली जिल्ह्यात १ मार्चपर्यंत राहणार जमावबंदी : मा. जिल्हाधिकारी यांनी जारी केले आदेश

गडचिरोली (जिमाका) : दि.१७ फेब्रुवारी (चंद्रपूर सप्तरंग, जिल्हा प्रतिनिधी : श्री कृष्णकुमार जी. निकोडे – ७४१४९८३३३९) संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात दि.१५ फेब्रुवारी २०२१ ते १ मार्च २०२१पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१चे कलम ३७ (१) (३) लागू करण्यात आलेले आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्ताची आवश्यकता असते. जिल्ह्यात दि.१९ फेब्रुवारी २०२१ रोजी शिव जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे व दि.२२ फेब्रुवारी २०२१ रोजी ओबीसी समाजांच्या विशाल महामोर्च्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच विविध राजकीय पक्ष, संघटनांमार्फत त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याच्या हेतूने धरणे, मोर्चे, आंदोलने, उपोषणे, रास्ता रोको इत्यादी आयोजित करण्याची शक्यता लक्षात घेता सदर कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित राहावे, या दृष्टीने संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात दि.१५ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत जमावबंदी आदेश लागू राहणार आहे.
या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याच्या दृष्टीने विवक्षित कृतींना मनाई करणे व अव्यवस्थेला प्रतिबंधक उपाय करणे आवश्यक आहे. या कालावधीत शस्त्र, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या वापरातून शारिरीक इजा होईल, अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर नेणे, कोणताही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, क्षेपणास्त्र सोडावयाची, फेकावयाची उपकरणे, साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे यावर प्रतिबंध घालण्यात आले आहे. राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा ज्यामध्ये उलथवून टाकण्याची प्रवृत्ती दिसून येत असेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे, अगर सोंग आणणे किवा अशी चित्रे, चिन्हे, फलक, वस्तु तयार करणे किंवा प्रसार करणार नाहीत. पोलिस विभागाच्या पूर्व परवानगीशिवाय कोणीही मिरवणूक काढू नये. पाच किंवा त्यापेक्षा जास्त इसम सार्वजनिक जागेत, सार्वजनिक रस्त्यावर किंवा सार्वजनिक चावडीवर सदर कालाधीच्या शेवटच्या दिवशी २४.००वा.पर्यंत कोणीही जमा होणार नाहीत किंवा कोणतेही कार्यक्रम आयोजित करणार नाही. हे कलम गडचिरोली जिल्ह्याच्या क्षेत्राकरीता लागू राहतील, असे जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी आदेशीत केले आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *