◼️ काव्यरंग : चेहऱ्याआड

चेहऱ्याआड

हसऱ्या चेहऱ्याच्या आड,
वेदनांचे गाव वसले आहे.,
नयनात साठलेले किती..?
अश्रु वाहतचं आहे…

निर्झर अश्रुंच्या धारात
मन गोंधळलेले आहे.,
अडकुनी सागरात, वेदनांची
जखम मनी कोरली आहे…

चंद्र ओवाळतो आताही ,
किनाऱ्याला पिंजत आहे,
खरं तर तिच्या सततच्या
निःशब्द भावना कळत आहे…

वेदनांच्या दुनियेत असूनही,
नुकतच गाली हसू आहे.,
नेत्र पापनीतिल असावे.
मोत्या वाणी चमकत आहे…

खाच खळग्यांच्या वाटेने,
परिस्थितीशी लढत आहे.,
जीवनाच्या प्रवाहात वाहतांना,
पायी काटे बोचत आहे…

रक्ताच्या धारा, असह्य वेदनांचे
विष पिवूनी समोर जात आहे.,
मागे दुःखाचं गाव तर
प्रयत्नासमोर सुखाचे दार आहे…

तेजोमय ऊर्जा अंगी,
जशी ताराच चमकत आहे.,
तूझ्या हिम्मतेला, असह्य
कष्टाला माझं सलाम आहे…

(एकटेपणात अदृश्य वेदनांचे घाव भरत नाही… कुणाला सांगल्याशिवाय मनाचे ओझे कमी होत नाही म्हणुन समोरच्या ओळी)

सांगून दे वेदनादायक रहस्यमय
गोष्ट, मनात काय आहे.,
परके प्रश्न तरी सोडवतील,
संवेदना देतील,
मन आणखी घाव घालत आहे…

कुणाच्या हातात हात दे, कुणाचं
साथ घे, एकटेपणात काय आहे.,
समोरचं समोरं बघं, निराशेतून
तुला बाहेर पडायचे आहे..,

विजय करायचे आहे.,,,
मन मोकळे जगायचं आहे…

नितेश खरोले
रवींद्र विद्यालय/महाविद्यालय चोपा.
गोरेगांव.गोंदिया.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *