◼️ काव्यरंग : छत्रपती शिवाजी महाराज

शिवछत्रपती

शिवनेरी वर जन्म जाहला
हर्ष जाहला कड्या कपारी
स्थापन करूनी जनतेचे राज्य
दिली सर्वदूर ललकारी !

पुत्र शोभता शहाजीराजांचे
अनेकांना गुन्ह्याचे दिले शासन
पर स्री मातेसमान मानून
आयाबहिणींचे केले रक्षण !

जमवून सवंगडी सभोवती
शपथ घेतली स्वराज्याची
शत्रूलाही जेरीस आणले
दाविली कर्तबगारी मावळ्यांची !

प्रतापगडाच्या पायथ्याशी
झुंज दिली गनिमी काव्याची
बलाढ्य अफजलखान चिरडला
किमया मात्र वाघनख्यांची!

मुरूड जंजिरा जलदुर्ग ही
साक्ष देती तुमच्या बुद्धीमत्तेची
केली भक्कम तटबंदीने
जडणघडण सागरी किल्ल्यांची !

राज्याभिषेक करून रायगडी
राजे तुम्ही ठरले महान
परकीयांनाही वाटे सदा
तुमच्या कार्याचा अभिमान !

रायगडाची उंची पाहून
अभिमानाने फुलते छाती
गर्वाने करू या जयजयकार
धन्य धन्य ते शिवछत्रपती !

राजे आपल्या महान कार्यास
आमचा हा मानाचा मुजरा
शिवजयंतीचा हाच सोहळा
श्रद्धापूर्वक करू या साजरा !!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *