छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने “काव्यराज” या काव्यसंग्रहाचे अनावरण
ठाणे : साहित्य हे अभिव्यक्त होण्याचे उत्तम साधन आहे. साहित्यक्षेत्रात उत्तम कामगिरी करण्यासाठी लेखक, कवी, कथाकार नेहमीच आपली प्रतिमा उंचावण्यासाठी प्रयत्न करत असतात तसेच सदैव कार्यरत असतात त्याचप्रमाणे हे साहित्य प्रसिद्ध होण्यासाठी तथा प्रकाशित होण्यासाठी प्रयत्न केले जातात. कालानुरूप प्रकाशित करण्याचे मार्ग बदलले तरीही समाजामध्ये आपले विचार व्यक्त करण्यासाठी साहित्यप्रेमी नेहमीच अग्रेसर असतात आणि त्यांना साथ करण्याचं कार्य तसेच प्रकाशन करण्याचे प्रयत्न केले जातात.
आजच्या काळात प्रकाशित साहित्य सोबतच सोशल मीडिया नेटवर्क आणि ऑनलाइन पद्धतीने साहित्य प्रकाशन करण्याचा प्रयत्न केला जातो. याच गोष्टीचा प्रत्यय महाराष्ट्राचे साहित्य गाथा या समूहाने आपला प्रातिनिधिक काव्य संग्रह प्रकाशित केला त्यावेळी आला. या काव्य राज ऑनलाइन प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे अनावरण आज दिनांक 19 फेब्रुवारी 2021 रोजी महाराष्ट्राचे आराध्य तथा अखिल तरुणाईचे आदर्श असे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने करण्यात
आले. हा काव्यसंग्रह Shopizen अँप आणि वेबसाईट वर उपलब्ध करण्यात आला आहे; ज्याचे मूल्य केवळ 30 रुपये इतके आहे. हा प्रातिनिधिक कविता संग्रह बनवण्याचा उद्देश असा की, मराठी साहित्य अजून दर्जेदार व्हावे. प्रत्येक साहित्यिकाने आणि साहित्याची लालसा असणाऱ्या प्रत्येक रसिक प्रेक्षकांनी वाचावा आणि रसग्रहण करावा असा हा काव्यसंग्रह आहे. अशी माहिती या समूहाचे प्रतिनिधी मा. श्री. धनराज गमरे यांनी दिली.◼️