मुरमाडी येथील छ.शिवाजी महाराज स्मारक समितीतर्फे
पी.डी.एज्युकेशन परिवाराच्या कार्याचा झाला सत्कार
गडचिरोली : दि.२० फेब्रुवारी (चंद्रपूर सप्तरंग, जिल्हा प्रतिनिधी : श्री कृष्णकुमार निकोडे – ९४२३७१४८८३) स्थानिक तालुक्यातील मुरमाडी येथे शुक्रवार दि.१९ फेब्रुवारी २०२१ रोजी शिवजन्मोत्सव निमित्त आयोजित शिवजन्म महोत्सव व शिवछत्रपतींच्या भव्य पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी पी.डी.एज्युकेशन परिवाराचा मुरमाडीच्या छ.शिवाजी महाराज स्मारक समितीतर्फे पी.डी.एज्युकेशन परिवाराचा सन्मानचिन्ह व शाल भेट देऊन सत्कार करण्यात आला.
त्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. कृष्णाजी गजबे तर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून आमदार मा.देवराव होळी उपस्थित होते. गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील गरीब तथा होतकरू विद्यार्थ्यांना पी.डी.एज्युकेशन या सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून मोफत स्पर्धापरीक्षा क्लासेस व कोरोना संकट काळात महाराष्ट्रभरातील विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाईन क्लासेस पुरविण्यात आले. संस्थेच्या या कार्याची दखल घेऊन समितीतर्फे त्या परिवाराचा सन्मानचिन्ह व शाल भेट देऊन सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी पी.डी. एज्युकेशनचे संचालक मा.दिनेश देशमुख व सहचारिणी मा.मधु देशमुख उपस्थित होते. मा.देशमुख यांनी संस्थेचे सहकारी
फिजिकल टीचर, शेबे फिजिकल अकॅडमी मा.मिथुन शेबे तसेच संस्थेचे कार्यकारी प्रमुख मा.सुभाष हुलके, सदस्य मा.जयपाल धारणे, सदस्य मा.किरण हुलके, सदस्य मा.लोमेश ठाकरे, मा.दिनेश मेश्राम व पी.डी.एज्युकेशन परिवाराच्या परिश्रमाचे फळ असल्याचे मनोदय व्यक्त करत स्मारक समितीला धन्यवाद दिला.◼️