◼️काव्यरंग : कधी तू….✍️ सदस्या मराठीचे शिलेदार समूह.

मराठीचे शिलेदार कविता, चारोळी समूहातील सर्व समूहात घेण्यात दि.१७/०२/२०२१ रोजी घेण्यात आलेल्या ‘बुधवारीय काव्यरत्न’ स्पर्धेतील ‘कधी तू’ या विषयावरील सर्वोत्कृष्ट ३ काव्यरचना. आपले मत, सूचना व अभिप्राय ‘सप्तरंगास’ कळवावे. तसेच वार्षिक वर्गणी भरून उपकृत करावे.

कधी तू..

कधी तू वाहणारा वारा
कधी तू चमकता तारा!१!

कधी तू मनातील गाणे
कधी तू प्रेमळ तराणे.!२!

कधी तू शब्दांचे गीत
कधी तू निर्मळ संगीत.!३!

कधी तू सुवास असा मंद
कधी तू पसरता मृदगंध.!४!

कधी तू होणारा आभास
कधी तू अंतरंगी ध्यास.!५!

कधी तू हृदयातील प्रित
कधी तू प्रेमाची जीत.!६!

कधी तू प्रसन्न अशी हिरवळ
कधी तू प्राजक्ताची दरवळ.!७!

कधी तू सुखद असा प्रवास
कधी तू बकुळाचा सुवास.!८!

प्राजक्ता आर खांडेकर
सदस्या मराठीचे शिलेदार समूह.
सुगत नगर ,नागपूर
☘️💞☘️💞☘️💞☘️💞☘️💞☘️💞
कधी तू..

मस्त मजेत जीवन जगावे
कधी तू.. हसावे कधी रूसावे
मी मात्र तुजकडे पहात बसावे
तुझ्या नजरेत हरवून जावे

हृदयी साठवूनी ठेवावी माझ्या
गुंतलेल्या हृदयाची आठवण
पेरलेला श्वास आहेस तू माझा
आहेस माझ्या स्पंदनाचे कोंदण

तुझीच असावी मी व्यस्तता
उधळूनी रंग तुजसवे प्रितीचा
पहाटेला सखे तुला पांघरावे
धुंद प्रितगीत तू गुणगुणावे

तुझ्या रेशमी कुंतल्यात सखे
हळूवार मी हात फिरवावा
अधर माझे सखये तुझ्या
ओष्ठपाकळ्यांना बिलगावा

श्रीकांत दीक्षित, पुणे.
©सदस्य मराठीचे शिलेदार समुह
☘️💞☘️💞☘️💞☘️💞☘️💞☘️💞
कधी तू…

कधी तू ढगाआडून
तर कधी डोंगरा आडून

चंद्र असतो रोज भेटीला
कधी प्रियकर प्रियसीच्या प्रेमसाक्षीला

तर कधी चंद्र असतो ‘मामा’ बनून
सर्व चिमुकल्यांच्या सोबतीला

कधी तुझी उपमा सौंदर्याला
तर तुझेच रूप साजरे पौर्णिमेला

तुला कधी देवाचा मान
तर कधी तुझ्या देखणेपणाची शान

कधी तू कणाकणाने वाढणारा
तर कधी तू कणाकणाने घटणारा

कसेही असो चंद्रा तुझे रुपडे
सानथोर सर्वांनाच तू आवडे

सौ. आशा गोवर्धने, नाशिक
सदस्या मराठीचे शिलेदार समुह
☘️💞☘️💞☘️💞☘️💞☘️💞

मुख्य प्रशासक/संपादक
◼️राहुल पाटील
७३८५३६३०८८
मुख्य परीक्षक/प्रशासक
◼️सौ सविता पाटील ठाकरे
➖➖➖➖🍁🌿🍁➖➖➖➖

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *