◼️ काव्य रंग : भाषा मराठी

भाषा मराठी

मराठी मुखे म्हणा
मराठी मुखे म्हणा
मातृभाषेची तुलना
कोण करी … ॥ धृ ॥

सुंदर ही भाषा
उभ्या महाराष्ट्रावरी
राज्य करी हजारो
वर्षापासुनिया …॥१॥

अमृताहूनी गोडं
लागे जिभेवरी
आवडते नेहमी
राही ध्यानी … ॥२॥

ग्रंथ कथा काव्य गाणी
गोड लागे कानी
कंठात गोडवा
विराजित … ॥३ ॥

मराठी माणुस म्हणे
हे मराठी चे सुख
गायीनं मुखाने
आवडीने … ॥४॥

मराठी मुखे म्हणा
मराठी मुखे म्हणा
मातृभाषेची तुलना
कोण करी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *