लेखाटोला येथे कुलदिपकाने केला जन्मदात्याचा खून

लेखाटोला येथे कुलदिपकाने केला जन्मदात्याचा खून

अंत्य संस्कारास जाऊ न दिल्याचे कारण

 

गडचिरोली : दि.२२ फेब्रुवारी (चंद्रपूर सप्तरंग, जिल्हा प्रतिनिधी : श्री कृष्णकुमार निकोडे – ९४२३७१४८८३) धानोरा तालुक्यातील लेखाटोला येथे पोटच्या कुलदिपकाने जन्मदात्या पित्याचा मुडदा पाडला. पित्याने पुत्राला गावातील एका अंत्यसंस्कारास जाऊ दिले नाही. या शुल्लक कारणावरून मुलाने बापाचा खून केला.

लेखाटोला येथील मुलाने स्वतःच्या वडिलाची हत्या केल्याची घटना दि.२० फेब्रुवारी २०२१ रोजी रात्री ८.४५ वा.च्या सुमारास घडली. अक्षय मनिराम पदा (वय २२) असे आरोपी मुलाचे नाव आहे. तर मनिराम बाजू पदा (वय ५३) असे मृतक वडिलाचे नाव आहे. या प्रकरणी धानोरा पोलिस स्टेशनमध्ये आरोपीविरूद्ध काल दि.२१ फेब्रुवारी २०२१ रोजी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *