वृक्ष आपले मित्र
वृक्ष आपले मित्र
सगेसोयरे छान
सृष्टी नटते हिरवळीने
एक झाड लावू महान
पर्यावरणाची आहे शान
वृक्ष देती सर्वांना छाया
पाने फुले फळे बघा
वृक्ष असती माया
झाड असते हिरवेगार
वारा देते थंडगार
एक झाड लावू आपण
प्रसन्नता वाटते फार
झाडांच्या फांदीवरती
भरते पक्ष्यांची शाळा
चिवचिवाट ऐकुन त्यांचा
लागतो बघा मनास लळा
पर्यावरणाला वाचवूया
ग्लोबल वार्मिंग ला घालू आळा
एक एक झाड लावूया
प्रदूषणाला सर्वजण टाळा
प्राणवायू मिळतो
वृक्षांपासून आज
एक एक झाड लावूया
पर्यावरणाची राखू लाज