◼️ काव्यरंग : ऋतू वसंत फुलला

ऋतू वसंत फुलला
अष्टाक्षरी काव्य

रंग सोनेरी लालिमा
ऋतू वसंत फुलला
सृष्टी नटली महान
वृक्ष दारी मोहरला

लाल केशरी रंगाचा
रानी पळस सजला
कोकिळेची कुहूकुहू
ऋतू वसंत फुलला

वसुंधरा नटलेली
नवी पालवी पसरे
पक्षी करी किलबिल
धुके हळूच ओसरे

गार वारा ही प्रितीचा
मोद नाद भरे सारा
गाठी फुलते प्रेमाच्या
मंद धुंद धुंद वारा

मोर पिसारा फुलला
आनंदित झाली सृष्टी
निसर्गात रंग दिसे
छान सजे रम्य दृष्टी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *