मा.आमदार गजबे धावले अपघातग्रस्ताच्या मदतीला

मा.आमदार गजबे धावले अपघातग्रस्ताच्या मदतीला

गडचिरोली-आरमोरी मार्गावर पडलेल्या अपघातग्रस्त जखमीला केले रुग्णालयात दाखल

गडचिरोली : दि.२४ फेब्रुवारी (चंद्रपूर सप्तरंग, जिल्हा प्रतिनिधी : श्री कृष्णकुमार निकोडे – ९४२३७१४८८३) अपघात झाला की सामान्य माणूस पोलिसांचा ससेमिरा नको म्हणून अपघातग्रस्तांना मदत करत नाहीत, तर राजकीय नेते व्यग्र दिनक्रमामुळे त्याकडे लक्ष देत नाहीत; परंतु मा.आमदार कृष्णा गजबे यांनी अपघात होऊन गडचिरोली-आरमोरी मार्गावर आरमोरी जवळील पेट्रोल पंपजवळ पडलेल्या अपघातग्रस्त जखमीला रुग्णालयात दाखल केले.
सदरील घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की दि.२३ फेब्रुवारी २०२१ रोजी मा.आ.कृष्णा गजबे हे कामे आटोपून रात्रौ १० वा.च्या सुमारास वडसाकडे निघाले होते. त्यांची गाडी आरमोरी जवळील पेट्रोल पंपजवळ आल्यानंतर त्यांना एक दुचाकीस्वार अपघात होऊन रस्त्याच्या कडेला पडलेला दिसला. हा अपघात पाहून आ. कृष्णा गजबे यांनी त्यांची गाडी थांबवली व आपल्या सहकाऱ्यांसह अपघातग्रस्त जखमीला रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. जखमी युवक मुखरु धोडरे रा.ठाणेगाव यांच्या घरी माहिती देऊन जखमीचे नातेवाईक रुग्णालयात पोहोचेपर्यंत आ.कृष्णा गजबे तिथे स्वतः थांबून मदत करण्याचे आदेश त्यांनी तेथील कार्यकर्त्यांना दिले. आ.गजबे यांनी केलेल्या मदतीबद्दल जखमींच्या नातेवाइकांनी तसेच ठाणेगाव वाशीयांनी त्यांचे आभार मानले. यासाठी नंदु नाकतोडे, भाजपाचे पंकज खरवडे, जितेंद्र ठाकरे, राकेश खेडकर यांनी सहकार्य केले.◼️

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *