◼️लेख : नेहमी अपेक्षित यश मिळेपर्यंत प्रयत्न करत रहा..

◼️ नेहमी अपेक्षित यश मिळेपर्यंत प्रयत्न करत रहा…


तूमच्या जीवनात तुम्हाला साध्य करावित अशी वाटनारी, अनेक कामे असू शकतात. तूमचा यशाकडे जाणारा प्रवास खडबडीत खडकांनी आणि झाडाझुडपांनी व्यापलेला असेल आणि तो डोंगर पार करणे तुम्हाला कठीण वाटत असेल; परंतु आपण लक्षात ठेवले पाहिजे की, आपल्या पुढील हे अडचणीचे, संकटाचे डोंगर आपल्याला वाटतात तेवढे चढउताराचे नसतात.

तूम्ही आपल्या मनात श्रध्दा बाळगा आणि ध्येयाच्या दिशेने वर चढायला सुरवात करा. तूमचे स्वप्न पूर्ण होईपर्यंत आगेकूच करीत रहा. आपल्या जीवनातील कोणतेही चांगली वाटनारी गोष्ट साध्य करणे कठीण नसते. प्रयत्न करीत राहण्याचे धैर्य तुमच्याकडे असेल आणि श्रद्धा असेल तर तुम्ही ठरवलेले ध्येय सहज गाठू शकता.श्रद्धा ही ज्ञान,शक्ती यापेक्षा अधिक प्रभावी प्रेरणा आहे.आणि तूम्ही जर परमेश्वराचा सुज्ञपणा आणि ईच्छाशक्ती यांवर विश्वास ठेवलात तर अनेक अपयशांचे रूपांतर यशामध्ये होईल; कारण श्रद्धेमध्ये पर्वत हलवण्याचे सामर्थ्य असते.

परमेश्वर करू शकत नाही अशी कोणतीही गोष्ट या जगात नाही. म्हणून आजपासून मनात श्रद्धा ठेवून तूमचे स्वप्न साकार, सफल होईपर्यंत पून्हा: पून्हा प्रयत्न करीत रहा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *