◼️ काव्यरंग : आम्ही हरणार नाही

◼️ आम्ही हरणार नाही

तू का? आला
कोणी धाडलं तुला
या भानगडीत म्या
काय,पडत नाय…

तू साऱ्या जगाला
वेठीस धरलं
माणूस जातीला
गनिमी काव्यान घेरलं

मंदिर मज्जीद चर्च
सारं ओस पडलं
श्वास अनेकांचे
बंद केले,दार ही देवाचं

पण,एक सांगतो तुला
आम्ही हरणार नाही
घरातून लढलो आम्ही
तुला शरण येणार नाही

तू एकट्यानं ये
किंवा दुकट्याने ये
संहार करू तुझा
तुला हे आव्हानं आमचे

तू आणि आम्ही
एकाच सृष्टीची जनुके
वर्चस्व वादाच्या
साठमारीत तुला निर्मिले

चूक कळली आमची
त्याची किंमत ही मोजली
शस्त्र लसीचे घेऊन हाती
कोरोना,तुला देऊ मूठमाती

पुसल्या नाहीत खुणा
अजून आमच्या उत्क्रांतीच्या
कित्येक शमविल्या त्सुनामी
आम्ही ब्रम्हांड,चराचराच्या…

म्हणून,म्हणतो बाबा
लई इरसाल हाय मानव प्राणी
गुप गुमान निघून जा
आम्ही आता हरणार नाही

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *