◼️मायमराठी
जन्मदिन हा कुसुमाग्रजांचा
परि आहे किती श्रेष्ठ महान
मराठी भाषा दिन म्हणूनी
केला आहे जगी सन्मान !
मायमराठी भाषा तुझे हे
उपकार किती मानवा वर
भाव मनीचे व्यक्त करण्या
प्रगटलीस तू जगतावर !
कधी भूपाळी अन् अंगाई
कधी अभंग,ओव्या गाई
कधी कविता कधी लावणी
कधी वीरांचे पोवाडे गाई !
नवरसांची तू निर्माती
संतमहात्म्यांची भक्ती
प्रेमिकांची लावण्यवती
तर कधी ठरते तू विरक्ती !
मनामधले अबोल भाव तर
कधी बोलती डोळ्यामधूनी
मायमराठी तुझी देणगी
लाभली सकला वाणी मधूनी !
माऊली अन् तुकोबांच्या
मुखातील ही वाणी चिरंतन
उतराई राहू सदा तुझे अन्
नतमस्तकाने करू या वंदन !!