◼️ काव्यरंग : सन्मान मराठी

🔴 सन्मान मराठी

समुद्रातून खोल आकाशापेक्षा उंच
आहे मराठी आपली
कधी शिवरायांच्या किल्ल्याप्रमाणे कणखर
तर कधी आईच्या मायेएवढी मऊ आहे मराठी आपली

नामदेव तुकाराम बहिणाबाईंनी
दिला मराठी भाषेला आकार
सहज सोप्या भाषेत बोलून
तळागाळापर्यंत पोहोचवला मराठी संस्कृतीचा विचार

भाग्य मला लाभले या मराठमोळ्या मातीत
जन्माला आल्याचे
बाराखडीत भर पडून
चौदाखडीने नटलेल्या मराठी भाषेचे

काना मात्रा वेलांटी उकार अशा सौंदर्याने नटलेल्या
मराठी भाषेला कशाचीच नाही कमी
इंग्रजीच्या वादळात सुद्धा ताठ उभी राहील मराठी माझी
याची आपण सर्वजण देऊ या हमी

असंख्य छटा आहेत माझ्या भाषेला
जसे की ऊन – पावसाचे इंद्रधनू
पण ओळख विचारली कुणी आमची
तर फक्त मराठी म्हणू

ज्या क्षेत्रात जातो तिथे अग्रस्थानी जाणे
ही मराठी वृत्ती आमची
मराठी ही केवळ भाषा नसून
जगण्याची संस्कृती आहे आमची

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *